Corona and Ayurved

corona covid-19
Coronavirus….. Prevention is better than cure
 
The name trending on global social media and infecting China almost same virally is 2019-nCoV This type of coronavirus isn’t completely new for us. I’m sure you remember something as MERS or SARS outbreak in recent past. This time the name is Wuhan novel coronavirus as it is believed to be originated from eating bat soup or snake in Wuhan province of China. The virus is growing rapidly and proved to be deadly one. 
 
The *symptoms* are like;
 
Respiratory symptoms like throat soreness, cold-cough, difficultly in breathing.
 
Gastroenteritis
 
Fever
 
There’s no proven treatment for this virus in medicinal science. However there have been some preventive instructions issued. So here’s a list of a blend of those instructions with Ayurveda principles in order to take preventive measure.
 
1. Put 2-2 drops of warm Pure Desi Cow Ghee in nostrils before going out for work. (Avoid in case of runny nose)
 
2. Use disposable masks.
 
3. Have hot water bath after returning home from work.
 
4. Do daily fomentation at your house using desi cow dung, ghee, medicinal camphor, neem leaves and loban. (Keep it away from people suffering with cough already) 
 
5. Use hanky if you have sneezing or coughing. Maintain distance from people having such symptoms.
 
6. Drink hot desi cow milk added with turmeric and dry ginger powder. (Avoid in case if runny nose) 
 
7. Don’t grab a bite or sip from others food or beverages to avoid the expos.
 
8. Wash veggies, fruits thoroughly. Avoid eating sandwich, salads, fruit dish etc from outside vendors or restaurants. 
 
9. Avoid touching eyes, nose or mouth without washing hands properly. 
 
10. Counsult your Ayurveda Doctor immediately in case ir cold-cough, fever at least for few more days. 
 
Beware of WhatsApp University messages of ‘CURE’ for coronavirus. Even this message suggests preventive measures and not treatment. Don’t believe or spread rumours regarding the epidemic taking place in India. Don’t rubbish preventive measures. They are very important if we want to restrict the epidemic in its second stage itself; before turning into dreadful pandemic. 
*’करोना’समय येता कोण कामास येतो?…..आयुर्वेद!*
 
आयुर्वेदात ‘करोना’चा उल्लेख आहे का? आमच्या पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला. आजवर अशा  प्रश्नांची सवय झाल्याने त्यांना म्हटलं; “हो. आहे.” 
 
“काहीतरी काय सांगताय? तेव्हा करोनाचा शोध लागला होता का?”
 
“नव्हता. तुम्हालाही माहिती असून हा प्रश्न विचारला ना? तरीही सांगतो. नाव माहिती नसलं तरी उपाय माहिती होते. मार्गदर्शक तत्व सांगितली होती.” 
 
चरक संहितेत ‘जनपदोध्वंसनीय विमान’ नावाचा अध्याय आला आहे. ‘जनपदोध्वंस’ म्हणजे आजच्या वैद्यकाच्या दृष्टीने Epidemic. करोना हा त्याचेच एक रूप. आता हा जनपदोध्वंस का होतो? तर दूषित वायू, जल, देश आणि काल यांमुळे. यांची मारकता उत्तरोत्तर अधिक सांगितली आहे. थोडक्यात ‘काळ’ आला असला तर कोणाचाही इलाज नाही! मग या व्याधींवर इलाज काय? सगळ्यात आधी यांचं कारण शोधून काढायला हवं. आयुर्वेद म्हणतो; ‘अधर्माचरण’ हे या रोगांचं कारण आहे. कसं बरं? दिनचर्या-ऋतुचर्या न पाळणं, प्रदूषण इथपासून ते रक्तपिपासूपणा, युद्धजन्य स्थिती, हरवत चाललेली माणुसकी हे सारं अधर्माचरणच नाही का? 
 
वाग्भट सांगतात;
नीचरोमनखश्मश्रुर्निर्मलाङ्घ्रिमलायनः ।
स्नानशीलः सुसुरभिः सुवेषो अनुल्बणोज्ज्वलः।।
 
– शरीरावरील केस, नख, दाढी यांचे नियमित कर्तन करावे, गुदद्वारादि ठिकाणे स्वच्छ असावीत, नियमित स्नान आणि सुगंधधारण करावे. 
 
नासंवृतमुखः कुर्यात्क्षुतिहास्यविज्रुम्भणम्।
 
– तोंडाला न झाकता शिंकणे, हसणे व जांभया देणे टाळावे. 
 
नासिकां न विकुष्णीयात्।
 
– नाक कोरु नये.
 
करोना येइपर्यंत आपण या गोष्टींना किती गांभीर्यानं घेतलं? ‘प्रतिबंध हा उपचारापेक्षा महत्वाचा’ ही शिकवण जगाला सर्वप्रथम देणाऱ्या आयुर्वेदाची आपणच उपेक्षा केली. आता मात्र जगाला आयुर्वेद प्रकर्षाने आठवतोय. ‘जनपदोध्वंस’ समयी काय प्रतिबंध करावा; याला जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीस आयुर्वेदाचा आधार देत खालील गोष्टी आपण करू शकता; 
 
१. कामासाठी बाहेर निघताना दोन्ही नाकपुड्यांत कोमट केलेल्या देशी गायीच्या साजूक तुपाचे २-२ थेंब टाकणे. (सर्दी असल्यास टाळावे.)
 
२. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे. 
 
३. कामावरून घरी आल्यावर कडकडीत पाण्याने अंघोळ करणे. 
 
४. घरामध्ये कडुनिंब, धूप, देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर असा धूप घालणे. (खोकला येत असणाऱ्या व्यक्तींपासून दूर ठेवावे.)
 
५. आपल्याला सर्दी-खोकला झाला असल्यास रुमालाचा वापर करणे, सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींशी बोलताना जास्त जवळ न जाणे. 
 
६. सकाळच्या वेळी कपभर देशी गायीच्या गरम दुधात हळद आणि सुंठ घालून पिणे. (सर्दी असल्यास टाळावे.)
 
७. ‘मला एक बाईट/सिप दे ना’ म्हणत म्हणत इतरांचे उष्टे खाणे, चहा इत्यादि पिणे सक्तीने टाळावे. 
 
८. भाज्या आणि फळे व्यवस्थित धुवून मगच वापरावी. बाहेर मिळणारे सॅलड्स, सँडविच, फ्रुट डिश इत्यादि पदार्थ टाळावे.
 
९. नाक, तोंड आणि डोळे यांना शक्यतो हाताने स्पर्श करू नये. करायचा झाल्यास हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री करावी. 
 
१०. सध्या काहीकाळ तरी सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्या वैद्यांना त्वरित भेटणे. 
 
आयुर्वेद सांगतो; जनपदोध्वंसापूर्वीच औषधींचा संग्रह वैद्यांनी करून ठेवावा. निसर्गाशी जवळीक साधली की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. देशी गायींबाबत काम करत असल्याने अशा संकटाची थोडीशी चाहूल लागली होती. वर दिलेल्या दहा टिप्स मी सोशल मीडियावर २५ जानेवारी रोजी शेयर केल्या होत्या. त्यावेळेस त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत; कारण भारतात करोनाचा प्रवेश होईल असं कोणालाही वाटत नसावं! 
 
आकडेवारी सांगते की; करोनाची मारकता ही १-३% इतकीच आहे. ‘करोनाबाधा झाली म्हणजे माणूस मेला’; असे अजिबात नाही. मात्र जे लोक बचवतात; त्यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती. आपल्याला आश्चर्य वाटेल पण ‘व्याधीक्षमत्व’ हा शब्द, संकल्पना आणि त्याचे प्रकार जगाला सर्वात प्रथम सांगितले ते ‘चरक संहिता’ या आयुर्वेदीय ग्रंथाने! करोनाचा सामना करताना ‘प्रतिबंध हाच उपाय’ असे सांगत आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि करोनाला आपोआप आळा बसेल. काही लक्षात आलं का? ‘रोगविशिष्ट उपाय’ हे आपले नेहमीचे धोरण सोडून आधुनिक वैद्यक एक वेगळा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवतंय. आपली क्षमता वाढवा; रोग आपोआप दूर होईल. दृष्टिकोन वेगळा आहे; नवा नाही! 
आचार्य चरकांनी तो हजारो वर्षांपूर्वीच देऊन ठेवला आहे. बघा ते काय म्हणतात;
 
जायन्ते हेतुवैषम्याद्विषमा देहधातवः|
हेतुसाम्यात् समास्तेषां स्वभावोपरमः सदा|| च.सू. १६/२७
 
अयोग्य हेतू सेवनाने शरीरातील धातू बिघडतात आणि पर्यायाने व्याधी निर्माण होतात. यावर उपाय काय? तर हे ‘हेतू’ म्हणजे रोगांची कारणे बदलणे. आणि शरीरास अनुकूल बाबींचे सेवन करणे. तसे केल्याने व्याधी आपोआप बऱ्या होतील! म्हणजे उठसूट रोगाला लक्ष्य न करता आपली अंतर्गत सुरक्षा यंत्रणा पक्की करणे आवश्यक. जेणेकरून रोग होऊच नये. वा झालाच तर बरा व्हावा. यानंतर आयुर्वेदातील अत्यंत महत्वाचा असा ‘स्वभावोपरम वाद’ मांडून आचार्य चरक पुन्हा एकदा आपल्याला तीच गुरुकिल्ली देत सांगतात; 
 
त्यागाद्विषमहेतूनां समानां चोपसेवनात्|
विषमा नानुबध्नन्ति जायन्ते धातवः समाः|| १६/३६
 
 
आता थेट जनपदोध्वंसावर काही उपाय आहे का? चरक सांगतात; अर्हता पाहून पंचकर्म देणे आणि त्यानंतर रसायन चिकित्सा घेत राहणे हा उत्तम उपाय आहे. ‘च्यवनप्राश दीर्घकाळ सेवन करण्याची गोष्ट आहे; महिनाभरापुरती बाब नाही.’ अशीही पोस्ट च्यवनप्राश बनवला होता तेव्हा केली होती. आज त्यांचंही महत्व आपल्याला कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधर्माचरण सोडायला हवं. फार खोलात जाऊ नका; किमान आपल्या वैद्यांना भेटून आयुर्वेदाला अपेक्षित दिनचर्या-ऋतुचर्या जाणून घ्या आणि आचरणात आणायला सुरुवात करा. जगभरात संशोधन करून आज हे सांगितलं जात आहे की प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाची मारकता घटेल. आयुर्वेद हे कित्येक शतकं सांगतोय. आज हळदीची मागणी वाढते आहे. यावर्षीची निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. जग आयुर्वेदाकडे आशेने बघतंय. आपण करंटेपणा कधी सोडणार? आयुर्वेद ही आपली जीवनशैली आणि पहिली चिकित्सापद्धती बनवा. वैद्य बांधवांनीदेखील ‘करोना काय करणार?’ हा निष्काळजी पवित्रा ते ‘करोना आणि आयुर्वेद यांचा काय संबंध?’ हा नकारात्मक पवित्रा सोडायला हवा. हीच वेळ आहे घराघरांत आयुर्वेद नेण्याची. चला; या जनपदोध्वंसावरून तरी काही बोध घेऊया!
 
© वैद्य परीक्षित स. शेवडे, एम.डी. (आयुर्वेद)
 
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
डोंबिवली आणि मडगाव (गोवा) 
 
अपॉईंटमेंटसाठी संपर्क:
8452007020 / 0251-2863835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help? Chat with us
satta king 786